नोंदणीकृत सेवा सहकारी संस्थाच्या समस्यांचे निराकरणाकरीता शुक्रवार दि. 3 रोजी बैठकीचे आयोजन

 

 

अकोला,दि.31(जिमाका)-   जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थाना येणाऱ्या अडचणी, समस्या, तक्रारी या विषयावर चर्चा करण्याकरीता शुक्रवार दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीत सेवा सहकारी संस्थाचे काही अडचणी,  समस्यातक्रारी एका पानावर लिखीत स्वरुपात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त यांच्याकडे गुरुवार दि. 2 सप्टेंबर पर्यत सादर कराव्यात.  बैठकीत कोव्हीड- 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासह मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टसिंग बाबींचे पालन करणे आवश्यक राहिल.  बैठकीला प्रत्येक सेवा सहकारी संस्थाच्या अध्यक्षचिव यांचे पैकी एक व्यक्ती अश्या फक्त 10 व्यक्तींना बैठकीत प्रवेश दिला जाणार आहे.

या अटीची नोंद घेऊन जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत सेवा सहकारी संस्थाचे अध्यक्षसचिव यांनी शुक्रवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालन येथे हजर राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे. 

.00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ