प्रधानमंत्री मातृ वंदना योजना; ‘मातृ वंदना सप्ताह’: गर्भवती महिलांचे कोविड लसीकरण




अकोला,दि.31(जिमाका)-  प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेअंतर्गत जिल्ह्यात दि. 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये योजनेसंबंधी विविध कार्यक्रमाव्दारे जनजागृती मोहिम राबवून जिल्ह्यातील गर्भवती  महिलांचे प्राधान्याने कोविड लसीकरण करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान नियामक समितीची आर्थिक व भौतिक बाबीचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसू, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. आरती कुलवाल, महिला व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, कुष्ठरोग विभागाचे सहाय्यक संचालक एम.एम. राठोड, जिल्हा कार्यकारी व्यवस्थापक संदिप देशमुख, आरोग्य कर्मचारी आदि उपस्थित होते.

मातृ वंदना सप्ताहामध्ये प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे विविध माध्यमाव्दारे प्रचार व प्रसिध्दी करावी, गर्भवती महिलेची नोंदणी, शिबीराचे आयोजन, महिलाकरीता कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थाना  प्रोत्साहित करणे यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. योजनेची माहिती जनसामान्यपर्यंत पोहोचविण्यासाठी आशासेविका व अंगणवाडी सेविकाचे सहकार्य घ्यावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिले.

यावेळी राष्ट्रीय आरोग्य मिशन, जननी सुरक्षा योजना, जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम, गर्भलिंग निदान व प्रतिबंध, आशा प्रशिक्षण, राष्ट्रीय कुष्ठरोग निमुलन आदि विविध आरोग्य विषयक बाबीचा आढावा घेवून शासनाकडून प्राप्त निधी तातडीने खर्च करण्याचे निर्देश यावेळी दिले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ