एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकासाठी माहे सप्टेंबर महिन्याचा नियतन मंजुर


अकोला,दि.23 (जिमाका)- जिल्ह्यातील एपीएल(केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यासाठी मासिक नियतन माहे जुलै ते सप्टेंबर 2021 करीता गहु 7770 क्विंटल व तांदुळ 1940 क्विंटल शासनाकडून मंजुर झाले आहे. तसेच शासकीय धान्य गोदाम यांच्या अहवालानुसार गहुचे 12314.39 क्विंटल शिल्लक असल्याने माहे सप्टेंबरचे वाटप शिल्लक असलेल्या साठातून पुढील प्रमाणे करण्यात येत आहे.

अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे तांदुळाचा 71 ‍क्वि., अकोला ग्रामीण  शासकीय धान्य गोदाम  येथे तांदुळाचा 313 ‍क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 536 क्वि. तर तांदुळाचा 134 ‍क्वि., अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 1919 क्वि. तर तांदुळाचा 479 ‍क्वि., तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 1206 क्वि. तर तांदुळाचा 301 ‍क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 686 क्वि. तर तांदुळाचा 171 ‍क्वि., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 585 क्वि. तर तांदुळाचा 146 ‍क्वि. व मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे गहुचा 1302 क्वि. तर तांदुळाचा 325 ‍क्वि., असे एकूण 1 लक्ष 94 हजार 234 शेतकरी लाभार्थ्यांना गहूचे 6234 क्विंटल तर तांदुळाचे 1940 क्विंटल मंजुर नियतन झाला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ