‘अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा’; 30 नोव्हेबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


अकोला,दि.24 (जिमाका)- केंद्रीय सिव्हील सेवा सांस्कृतिक आणि क्रीडा मंडळ, नवी दिल्ली यांच्या मार्फत विविध प्रकारांतील खेळ अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धचे दरवर्षी आयोजन केल्या जातात. केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धचे राज्य शासनाच्यावतीने आयोजन केल्या जातात. या स्पर्धसाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेन स्पर्धासाठी पाठविले जातात.

राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धासाठी विविध खेळ प्रकारांतील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबीराची जबाबदारी  सोपविली आहे. जिल्ह्यातील विविध शासकीय विभागाच्या अधिपत्याखालील कार्यरत असलेले खेळाडूनियमित कर्मचाऱ्यांस निदर्शनास आणून टेबल टेनिस, बॅडमिटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरन, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम, बुध्दीबळ, ॲथलेटिक्स, लघुनाटय, कबड्डी, वेटलिफ्टींग,पॉवरलिफटींग, शरिरसौष्ठव, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धातून ज्या खेळाडू कर्मचाऱ्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी आवेदनपत्र कार्यालय प्रमुखविभाग प्रमुख यांच्या मान्यतेने एक आगावू प्रतीसह पाठवावे. अशी आवेदनपत्र व्यवस्थापक, सचिवालय जिमखाना, मुबंई 400032 यांचेकडे दि.30 नोव्हेंबर 2021 पर्यत टपालाव्दारे किंवा व्यक्तीश: तसेच sachivalayagym@rediffmail.com या ईमेल वर तर अधिक माहिती करीता जिल्हा क्रीडा अधिकारी दिनकर उजळे यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ