पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

 अकोला,दि.27(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शनिवार दि. 28 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शनिवार दि.28 रोजी सकाळी नऊ वाजता अमरावती येथून लाहोरी खु.ता.अकोटकडे प्रयाण, सकाळी साडेदहा वाजता श्री. संत गिराजी महाराज संस्थान लोहारी बु. ता. अकोट येथील विकासकामांचा लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी पावणेअकरा वाजता मौजे मुंडगांव  ता.अकोटकडे प्रयाण व सकाळी 10 वा.55‍ मि. नी ग्रामपंचायत भवन लोकार्पण कार्यक्रम व विविध कामांचे भुमिपुजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वा. 35 मि.नी मौजे बळेगाव ता.अकोटकडे प्रयाण, दुपारी 11 वा.55 मि.नी ग्रामपंचायत बळेगांव ता. अकोट येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारत व रस्ता लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी सव्वाबारा वाजता अकोलाकडे प्रयाण व दुपारी सव्वा वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आगमन

 जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे विविध विषयाचा आढावा बैठकीस उपस्थिती :

1)     दुपारी सव्वा वाजता शेतकरी आत्महत्या संदर्भात आढावा सभा.

2)     दुपारी 1 वा.40 मि.नी बालसंगोपन योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणेबाबत आढावा सभा.

3)     दुपारी दोन वाजता व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसन गावातील सोयी सुविधांचा अभाव व अडीअडचणी व त्यावर उपाययोजना करणेबाबत आढावा सभा.

4)   दुपारी 2 वा.25 मि.नी दिव्यांग निधी खर्च करणेबाबत आढावा सभा.

5)    दुपारी 2 वा. 50 मि.नी नगर परिषद बाळापुर यांनी बांधकाम केलेल्या घरकुल वाटप व लाभार्थी राहण्यास इच्छुक नसल्याप्रकरणी आढावा सभा.

6)     दुपारी सव्वातीन वाजता वान धरण ता. तेल्हारा जि.अकोला येथील पाणी पाईपलाईनव्दारे कृषी सिंचनाकरीता देण्याबाबत आढावा सभा.

7)     दुपारी 3 वा.40 मि.नी संत्रा पिक विमा गेल्या तीन ते चार वर्षापासून हिवरखेड मंडळला(वारी भैरवगड) मिळाला नसल्याबाबत आढावा सभा.

8)    दुपारी चार वाजता फाळणीचे वेळी पाकिस्तानातून आलेल्या विस्थापितांना भरपाई संकोष मालमत्ता मधुन देण्यात आलेल्या जमिनीचे धारणाधिकारा संदर्भात आढावा सभा.

9)     दुपारी 4 वा.20 मि.नी श्री.संत तुकाराम विद्यालय किनखेड पुर्णा ता. अकोट येथील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या अडचणी बाबत आढावा सभा.

दुपारी 4 वा. 20 मि.नी ग्रॅण्ड जलसा, रिधोरा रोड अकोलाकडे प्रयाण व सायंकाळी साडेचार वाजता लोकमत परिवाराच्यावतीने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सवडीने दर्यापुर मार्गे अमरावतीकडे प्रयाण.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ