शुक्रवारी (दि.27) ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

 अकोला,दि.24(जिमाका)- जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबई यांचे मार्फत कौशल्‍यातून रोजगारा कडे (Future Jobs)-भविष्‍यातील रोजगाराच्‍या संधी  या विषयावर शुक्रवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते साडेचार या वेळेत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनारचे होणार आहे.

या वेबीनारमध्‍ये आयजीपीव्हीईटी औरंगाबादचे तांत्रिक सल्लागार रविशंकर कोरगल,  इण्डस अँड अग्री मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे संचालक मराठा प्रशांत गिरबाने, बीव्हीजी प्रा.लि.चे संचालक हनुमंतराव गायकवाड हे प्रमुख  मार्गदर्शन करणार आहेत. तसेच काही प्रश्‍न असल्‍यास  दुपारी सव्वाचार ते साडेचार या वेळेत विचारु शकता.  फेसबुक व युटयुबवरुन थेट प्रसारण होणार असून फेसबुककरीता maha sdeed तर युटयुबकरीता  maha_sdeed या लिंकचा वापर करावा. या ऑनलाईन वेबीनारचे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी  लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्‍त, अकोला यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ