‘महाडीबीटी पोर्टल योजनाः अर्ज एक,योजनाअनेक’ कृषी विभागाचे मोबाईल अप्लिकेशन

 अकोला, दि.१२(जिमाका)- महाडीबीटी पोर्टलवर शेतकरीयोजनाया सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत कृषी विभागाने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे शेतकरी त्यांच्या पसंतीच्या शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करु शकता. तरी शेतकऱ्यांनी या मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांनी केले आहे.

महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/हे संकेतस्थळ आहे.

महा डीबीटी पोर्टल वर लॉटरी प्रक्रियेतून  विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची निवड झालेली आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून पूर्वसंमती पत्र प्राप्त झाल्यावर कागदपत्रे छाननीकरिता डीबीटी पोर्टलवर  अपलोड करावी लागतात. परंतु कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर नजीकच्या सामुहीक सेवा केंद्रे,कृषी कार्यालये  इ. ठिकाणी जाऊन कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्यास गैरसोईचे होते. त्यामुळे पुढील छाननी प्रक्रियेतील विलंबामुळे  जलद अनुदान  वितरणास मर्यादा येतात.

शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी कृषी विभागाने MahaDBT Farmerनावाचे मोबाईल अप्लिकेशन तयार केले आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या android स्मार्ट मोबाईल वरून गुगल प्ले स्टोअरवर जाऊन MahaDBT Farmer हे अप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे.

ही सुविधा वापरकर्ता आयडी व आधार क्रमांक आधारित असल्याने एकाच गावातून स्मार्ट मोबाईल असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यास अनेक लाभार्थी त्यावरून कागदपत्रे अपलोड करू शकतात.

या कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता. तसेच यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या ई-मेल वर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तरी सर्व शेतकरी बांधवांनी MahaDBT Farmerया मोबाईल अप्लिकेशन चा वापर करून आपली कागदपत्रे लवकरात लवकर अपलोड करावीत, जेणेकरून अनुदान वितरण प्रक्रिया जलद होईल ,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना