नाविन्‍यपुर्ण व्‍यवसाय संकल्‍पना प्रकल्पांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट

 


                        अकोला, दि.१३(जिमाका)- जिल्‍हा नाविन्‍यता परिषदेमार्फत दोन नाविन्यपूर्ण संकल्‍पनांना  आज जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा नाविन्‍यता परिषद, अध्यक्ष  नीमा अरोरा यांनी आज भेट देऊन पाहणी केली. या प्रसंगी जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्‍त द.ल.ठाकरे, शासकीय औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य महेश बंडगर, उपप्राचार्य शरद ठाकरे, सहा.प्रशिक्षणार्थी सल्‍लागार एस.बी.घोंगडे यांची उपस्थिती होती. यावेळी राहूल पवार या नव उद्योजकाने  स्‍थापन केलेल्‍या  रॉयल वॉल कलर पुट्टी या एम.आय.डि.सी. फेज क्रमांक ४ युनिटची प्रत्‍यक्ष पाहणी केली. तसेच अक्षय कवळे यांनी स्‍थापन केलेल्‍या ॲग्रोशुअर प्रॉडक्‍ट, नॅशनल हायवे नंबर ६ शिवणी,अकोला येथे भेट देऊन त्यांच्‍या सोयाबीन आणि हरभरा कापणी यंत्र या नाविन्‍यपुर्ण संकल्‍पनेची माहिती जाणून घेतली. युवकांनी नाविन्‍यपुर्ण संकल्‍पना प्रत्‍यक्षात आणून व्‍यवसाय स्‍थापन करावा असे श्रीमती अरोरा यांनी या प्रसंगी केले.

महाराष्‍ट्र राज्‍य नाविन्‍यता परिषदेच्‍या www.msins.in या संकेतस्‍थळावर नवउद्योजकांना आपल्‍या नाविन्‍यपुर्ण संकल्‍पना प्रत्‍यक्षात आणण्‍यासाठी आवश्‍यक ती माहिती उपलब्ध असते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ