कावड पालखी: मानाच्या एका पालखीसह 25 शिवभक्तांना परवानगी


अकोला,दि.30(जिमाका)- कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार धार्मीक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी अकोला येथील राजराजेश्वर मंदिरात व्हायच्या पालखी कावड यात्रा उत्सवात केवळ मानाची एक पालखी व 25 शिवभक्तांना परवानगी देण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.

यासंदर्भात आदेशात म्हटल्यानुसारतिसऱ्या लाटेचा धोका व कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेवून मंदीराचे विश्वस्थ व कावड पालखीचे पदाधिकारी यांच्या समन्वयाने मानाच्या एका कावड पालखीकरीता स्वतंत्र्य वाहनातून 25 शिवभक्तांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून परवानगी देण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गेमित केले आहे.

      शेवटच्या श्रावण सोमवार दि. 6 सप्टेंबर रोजी राजराजेश्वर मंदिरातील पिंडीवर जलाभिषेक करण्यासाठी शहरातून मानाच्या पालखीला गांधीग्राम येथुन राजेश्वर मंदिरापर्यंत पायदळ न आणता ठराविक वाहनांमधून केवळ 25 व्यक्तींना  परवानगी देण्यात आली आहे. तसेच शेवटच्या श्रावण सोमवारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गांधीग्राम ते राजराजेश्वर मंदिर मिरवणूक मार्गावर सोमवार दि. 6 रोजी पहाटे चार पासून रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागु करण्यात आली असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

अकोला महानगरपालिका क्षेत्रातील संपुर्ण मिरवणूक मार्गावर कलम 144 लागु राहील, कावड पालखीकरीता कोणत्याही प्रकारच्या ध्वनीक्षेपक साहीत्याचा वापर अनुज्ञेय राहणार नाही, प्रतिबंध करण्यात आलेल्या कालावधीमध्ये राजराजेश्वर मंदीरामध्ये भाविकांना प्रवेश अनुज्ञेय राहणार नाही, मंदिरातील विश्वस्थ, पुजारी यांना मंदीराच्या आतील पुजा अर्चा करण्याची मुभा राहील. कावड पालखी करिता ज्या भाविकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यांनी मास्कचा वापर तसेच सोशल डिस्टनसींगचे नियम पाळणे बंधनकारक आहे. तसेच त्यांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील, आदेशाचे तंतोतंत पालन होण्याचे दृष्टीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पुरेश्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तासह आवश्यक ती कार्यवाही करावी. या आदेशाद्वारे विहीत करण्यात आलेल्या कोणत्याही निर्बधांची किंवा काढलेल्या  आदेशाची अवज्ञा करणाऱ्या व्यतक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असेही आदेशात म्हटले आहे.

000000000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ