पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपूजन, लोकार्पण

 










अकोला, दि. 28(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते अकोट तालुक्यात ग्रामपंचायत भवनाचे उद्घाटन व भुमिपूजन, जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे व विविध कामाचे लोकार्पण करण्यात आले.

अकोट तालुक्यातील मुंडगाव येथील ग्रामपंचायत भवनाचे तसेच  विविध कामाचे  लोकार्पण  ना. कडू यांच्या उपस्थितीत पार पडले. ग्रामिण भागातील नागरिकांना स्थानिक स्तरावरच उपचार करता यावा यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आधुनिक सोईसुविधा निर्माण करा. आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे निर्देश यावेळी दिले.  त्यानंतर ग्रा.पं. बळेगांव ता.अकोट येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळेचे शैक्षणिक गुणवत्ता व आवश्यक सोईसुविधा वाढविण्यासाठी आवश्यक ते निधी देण्याचे आश्वस्त केले. याकामी लोकप्रतिनिधी व लोकसहभागातून शैक्षणीक दर्जा व सुविधा वाढविण्यासाठी सहभाग घेण्याचे आवाहन पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी केले. लोहारा बु. ता. अकोट येथील मिराजी महाराज संस्थान येथील विकासकामांचे लोकार्प पालकमंत्री ना. बच्चू कडू यांच्याहस्ते करण्यात आले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ