257 अहवाल, शून्य पॉझिटीव्ह; 13 डिस्चार्ज

 


अकोला,दि.18(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 257 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 257 अहवाल निगेटीव्ह आले, तर 13 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.17) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57806(43212+14417+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शून्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य  = एकूण पॉझिटीव्ह शून्य.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 310370 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 306800 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3168 नमुने होते. आजपर्यंत एकूण 310331 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 267119 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शून्य पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात आरटीपीसीआर व रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

 

13 जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 13 जणांना डिस्चार्ज  देण्यात आला, अशी  माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

17 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57806(43212+14417+177) आहे. त्यात 1136 मृत झाले आहेत. तर 56653 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 17 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ