राष्ट्रध्वजाच्या प्लास्टीक, कागदी प्रतिकृती वापरास बंदी
अकोला, दि.११(जिमाका)- राष्ट्रीय सण उत्सव या काळात कागदाच्या व प्लास्टीकच्या राष्ट्रध्वज प्रतिकृतींचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. तथापि, ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार अशा वापरावर बंदी असुन असा वापर करणारे नागरिक, विद्यार्थी ,उत्पादक,विक्रेते, वितरक व मुद्रक यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
यासंदर्भात
जिल्ह्यातील विविध शासकीय निमशासकीय, अशासकीय
कार्यालये, स्वयंसेवी संस्था, प्रतिष्ठाने, स्थानिक
प्राधिकरणे, शैक्षणिक संस्था,कार्यालये, प्रतिष्ठाने व
प्राधिकरणे तसेच इतर संस्थांनी ध्वजरोहणाच्या वेळी ध्वज वापराबाबत भारतीय ध्वजसंहितेमध्ये
दिलेल्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच वापरास उपयुक्त नसलेले, फाटलेले, जीर्ण व खराब झालेले ध्वज वापरू नये किंवा माती लागलेले तसेच रस्त्यावर, मैदानात
पडलेल्या राष्ट्रध्वज प्रतिकृती गोळा करुन ते तालुका व जिल्हा
स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करावेत. विल्हेवाट
लावण्याकरीता गोळा केलेले राष्ट्रध्वज व राष्ट्रध्वज
प्रतिकृती
तालुका
पातळीवर तहसिलदार कार्यालय व जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जमा
करावेत. राष्ट्रध्वज प्रतिकृतींची परस्पर विल्हेवाट लावल्याचे आढळल्यास
संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
प्लास्टीक व कागदी राष्ट्रध्वजांचा वापर थांबविण्यासाठी नियंत्रण
व जनजागृती करण्याकरीता जिल्हा व तालुका पातळीवर समित्या गठीत करण्यात आल्या
आहेत. शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था व सर्व यंत्रणामार्फत ही बाब विद्यार्थी व
नागरिकांच्या निदर्शनास आणुन देण्याकरीता सर्वांनी सहकार्य करावे,असे
आवाहन जिल्हा प्रशासनाने केले
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा