अकोला,दि.22(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात काल (दि.21) दिवसभरात
झालेल्या 203 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला येथे दोन, अकोट येथे एक, अकोला महानगरपालिका येथील
150, आरोग्य कर्मचाऱ्यांचे सात, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 36, हेगडेवार लॅब येथे दोन चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर मूर्तिजापूर
येथे पाच चाचण्या होऊन त्यात एकाचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, असे 203 जणांच्या चाचण्या होऊन त्यात एकाचा अहवाल
पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून
देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा