289 अहवाल, एक पॉझिटीव्ह; एक डिस्चार्ज

 अकोला,दि.21(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 289 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 288 अहवाल निगेटीव्ह तर एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच एकाला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि. 20) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57808(43214+14417+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक  + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य  = एकूण पॉझिटीव्ह एक.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 311041 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 307467 फेरतपासणीचे 402  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3172 नमुने होते. आजपर्यंत एकूण 310994 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 267780आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

एक पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका महिलेचा समावेश असून ती अकोला मनपा हद्दीतील रहिवासी आहे. दरम्यान काल (दि.20) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची नोंद घ्यावी.

एक डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन मधील एकाला डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

18 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57808(43214+14417+177) आहे. त्यात 1136 मृत झाले आहेत. तर 56654 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 18 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम