३२६ अहवाल, दोन पॉझिटीव्ह; पाच डिस्चार्ज

 अकोला,दि.१४(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ३२६ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३२४ अहवाल निगेटीव्ह तर दोन अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.१३) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८०२(४३२०९+१४४१६+१७७)झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य  = एकूण पॉझिटीव्ह दोन.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३०९४५८ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३०५८९८ फेरतपासणीचे ४०१ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१५९ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३०९४१७ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २६६२०८ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दोन पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात दोन जणाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दोन्ही रुग्ण पुरुष असून मनपा हद्दीतील आहे.दरम्यान काल (दि.१३) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची नोंद घ्यावी.

पाच जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दोन जणांना तर होम आयसोलेशन मधील तीन जणांना असे पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

३५ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८०२(४३२०९+१४४१६+१७७)आहे. त्यात ११३५ मृत झाले आहेत. तर ५६६३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३५ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ