जिल्ह्यात राबविणार व्यसनमुक्ती अभियान :स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री बच्चू कडू यांचा संकल्प; पोलीस स्टेशन निहाय घेणार व्यसनाधीन व्यक्तींचा शोध

 



अकोला,दि.१५(जिमाका)- एक व्यसनाधीन व्यक्ती हा त्या कुटुंबातील व्यक्तिंच्या आणि पर्यायाने समाजाच्या प्रगतीला मारक ठरू शकतो, समाजाची ही अशाप्रकारची अधोगती थांबविण्यासाठी जिल्ह्यात व्यसनमुक्ती अभियान राबविण्याचा संकल्प, राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज स्वातंत्र्यदिनानिमित्त येथे केला.

यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी आदी उपस्थित होते.

यावेळी ना.कडू म्हणाले की, समाजात व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढू नये, तसेच भावी पिढी ही व्यसनांच्या विळख्यात येऊ नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी आता सध्या समाजात जे व्यसनाधीन व्यक्ती आहेत. त्या व्यक्तींची माहिती ग्रामीण भागात पोलीस पाटील व शहरात पोलीस स्टेशननिहाय घेण्यात यावी. व्यसनाधीन व्यक्ती  व्यसनांच्या किती आहारी गेली आहे,त्याचे प्रमाण पाहून त्यांना औषधोपचार व समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देता येईल. यासाठी पोलीस स्टेशननिहाय माहिती सादर करावी,असे निर्देशही ना.कडू यांनी यंत्रणेला दिले.

या माध्यमातून व्यसनमुक्तीचे एक चांगले मॉडेल विकसित करण्याचा आपला मनोदय असल्याचे ना.कडू यांनी स्पष्ट केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम