स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतनाची थकबाकी मिळणार; कागदपत्र जमा करण्याचे आवाहन

 

अकोला,दि.30(जिमाका)-  जिल्ह्यातील स्वातंत्र्य  सैनिक, विधवा पत्नी यांना केंद्रशासनाची स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनासह राज्यशासनाचे पाचशे रुपये निवृत्तीवेतन दिला जातो. अशा स्वतंत्र्य  सैनिक, विधवा पत्नी, वारसदार यांना स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतनाची थकबाकी रक्कम 2004 पासून तत्कालिक दरानुसार देणेबाबत शासनाने निर्देशीत केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ज्या स्वातंत्र्य सैनिकानी केंद्रशासनाची स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतनधारकांनी याआधी राज्य शासन स्वातंत्र्य सैनिक निवृत्तीवेतन थकबाकी रक्कमेचा लाभ घेतला नाही, अशा स्वातंत्र्य सैनिक, विधवा पत्नी, वारसदार यांनी स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र, स्वातंत्र्य सैनिक सन्मानपत्र, मूत्यृप्रमाणपत्र, न्यायालयीन वारस प्रमाणपत्र, पी.पी.ओ प्रत, आधार कार्ड या आवश्यक कागदपत्रासह नाझर शाखा(स्वातंत्र्य सैनिक कक्ष), जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक मिरा पागोरे यांनी केले आहे.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ