आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धा २०२१: इच्छुक उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन

            अकोला, दि.१३(जिमाका)- सन २०२१ मध्ये ‘World Skill Competition-2021’ (China-Shanghai) येथे आयोजीत करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्व तयारीसाठी राज्यस्तरावर Skill Competition चे आयोजन करण्यात आले आहे, या स्पर्धेसाठी इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्‍त द.ल.ठाकरे यांनी केले आहे.

            यासंदर्भात त्यांनी दिलेली माहिती अशी की, आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धा २०२१ साठी देशाचे नामांकन निश्चित करण्यासाठी दि. १७ व १८ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर, दि. २२ ते २४ ऑगस्ट दरम्यान विभागीय स्तरावर व दि. ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान राज्यस्तरावर कौशल्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दि.१५ पर्यंत नोंदणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी खाली दिलेल्या लिंकव्दारे नोंदणी करावी.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScc9hV8zb9-eIBlPWfEYny_XK0485eibd8vzLbX24LphXPQDw/viewform

            स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांना भेट द्यावी

https://kaushalya.mahaswayam.gov.in/

https://worldskillsindia.co.in/worldskill/world/

https://worldskillsindia.co.in/kazan2019.php

            इच्छुक उमेदवारांनी स्पर्धेबाबत अधिक माहिती करीता  संकेतस्‍थळांना भेट द्यावी तसेच  सोबत देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून आपली परिपूर्ण माहिती भरावी, तसेच याबाबत काही अडचण आल्‍यास कार्यालयाच्‍या ०७२४-२४३३८४९ या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्‍त द.ल.ठाकरे यांनी केले आहे.

०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा