338 अहवाल प्राप्त, एक पॉझिटीव्ह ; रॅपिड चाचण्यात एक पॉझिटीव्ह


अकोला,दि.15(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 338 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 337 अहवाल निगेटीव्ह तर एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.14) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57804(43210+14417+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह दोन.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३०९७७८ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३०६२१५  फेरतपासणीचे ४०१ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१६२ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३०९७५५ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २६६५४५ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 एक पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हा रुग्ण महिला असून ती बाळापूर तालुक्यातील आहे. दरम्यान काल (दि.14) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात एक अहवाल पॉझिटीव्ह आला, त्याची नोंद एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी.

३७ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57804(43210+14417+177) आहे. त्यात 1135 मृत झाले आहेत. तर 56632 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३७ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम