सन २०१९-२० व सन २०२०-२१ चे जिल्हा युवा पुरस्कार घोषीत

 





अकोला, दि.१३(जिमाका)- जिल्ह्यातील युवाकांनी केलेल्या समाज हिताच्या कार्याचा गौरव व्हावा युवा विकासाचे कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात  येतो. युवक युवती यांना पुरस्कार स्वरुपात गौरवपत्र, सम्मानचिन्ह रोख रक्कम दहा हजार रुपये तसेच संस्थेसाठी गौरवपत्र, सम्मानचिन्ह रोख रक्कम पन्नास हजार रुपये  पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

जिल्हा युवा पुरस्कार  सन २०२१९-२० सन २०२०-२१  चे पुरस्कार घोषि करण्यात आले आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वा. जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे आयोजित स्वातंत्र्य दिन वर्धापन दिन सोहळ्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री ना. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल,असे जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी कळविले आहे.

 

जिल्हा युवा पुरस्कार सन २०१९-२० करीता निवड झालेले पुरस्कारार्थीं

१)     जिल्हा युवा पुरस्कार (युवक)- शिवाजी सुखदेव भोसले, एस.बी.आय.कॉलनी ., गजानन पेठ, अकोला.

२)     जिल्हा युवा पुरस्कार (युवती)- कु.सानिका दशरथ जुमळे, मु.पो.रा. लक्ष्मी नगर मोठी उमरी, जि.अकोला

३)     जिल्हा युवा पुरस्कार (संस्था)- संत कबीर क्रीडा, शिक्षण बहूउद्देशिय संस्था, कानशिवणी,  ता. जि. अकोला.

जिल्हा युवा पुरस्कार सन २०२०-२१  करीता निवड झालेले पुरस्कारार्थीं

१)     जिल्हा युवा पुरस्कार (युवक)- श्री रोहन पन्नालाल बुंदेले,अकबर प्लॉट किसान चौक, अकोला

२)    जिल्हा युवा पुरस्कार (युवती)- कु.वैष्णवी श्यामराव गोतमारे,पहिली लाईन, तापडिया नगर, अकोला

३)     जिल्हा युवा पुरस्कार (संस्था)- स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठाण, पातुर ता.पातूर, जि.अकोला

०००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ