रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 244 चाचण्यात एक पॉझिटीव्ह

 


अकोला,दि.28(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.27) दिवसभरात झालेल्या 244 चाचण्या झाल्या त्यात एक अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

काल दिवसभरात अकोला येथे दोन, पातूर येथे एक, मुर्तिजापूर येथे तीन, अकोला महानगरपालिका येथील 175, आरोग्य कर्मचाऱ्यांचे पाच,  हेगडेवार लॅब येथे आठ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 50 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे 244 जणांच्या चाचण्या होऊन त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ