305 अहवाल, शुन्य पॉझिटीव्ह; तीन डिस्चार्ज

अकोला,दि.26(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 305 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 305 अहवाल निगेटीव्ह तर शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. तसेच तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि. 25) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57816(43221+14418+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य  + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य  = एकूण पॉझिटीव्ह शुन्य.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 312367 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 308784 फेरतपासणीचे  402  तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3181 नमुने होते. आजपर्यंत एकूण 312331 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 269110  आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

शुन्य पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात आरटीपीसीआर  रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

तीन डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन मधील तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

13 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57816(43221+14418+177) आहे. त्यात 1136 मृत झाले आहेत. तर 56667 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 13 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ