रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 455 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
अकोला,दि.7(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी
जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.6) दिवसभरात झालेल्या 455 चाचण्या
झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा
रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोट येथे चार, बाळापूर
येथे पाच, बार्शीटाकळी येथे सात, तेल्हारा येथे चार, मुर्तिजापूर येथे 27, अकोला महानगरपालिका येथे 329, अकोला आयएमए येथे चार, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 22, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 41,
हेगडेवार लॅब येथे 12 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 455 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल
पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लक्ष सात हजार 133 चाचण्या झाल्या पैकी 14470 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह
आले आहेत, अशी माहिती जिल्हा
रुग्णालयातून देण्यात आली आहे.
0000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा