जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश: रविवार (दि.१५) पासून सुधारीत मार्गदर्शक सुचना; दुकाने, मॉल्स, हॉटेल्स यांना रात्री १० पर्यंत मुभा

 अकोला, दि.१३(जिमाका)- राज्‍यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून, कोरोनाच्‍या डेल्‍टा प्‍लस विषाणूने बाधीत रुग्‍ण आढळून येत आहेत.   तसेच सार्वजनिक आरोग्‍य विभाग, महाराष्‍ट्र शासन यांच्यावतीने  संपूर्ण राज्‍यासाठी सुरु करावयाच्‍या विविध सेवा, आस्‍थापना व  त्‍यांच्‍या वेळा बाबत सुधारित मार्गदर्शक सूचना प्राप्‍त झाल्‍या आहेत. त्यानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घेऊन जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी  रविवार दि.१५ ऑगस्ट पासून अकोला शहर तसेच जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण  भागासाठी  निर्बंधांबाबत आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशान्वये,

१.      खुली अथवा बंदिस्‍त उपहारगृहे आसन व्‍यवस्‍थेच्‍या ५०% क्षमतेने खालील बाबींच्‍या  अधिन राहून सुरु करण्‍याची मुभा देण्‍यात आली आहे.

अ)   उपहारगृह/बारमध्‍ये प्रवेश करतांना, प्रतीक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्‍या  कालावधीत मास्‍कचा  वापर अनिवार्य  राहील व या बाबतच्‍या स्‍प्‍ष्‍टसूचना उपहारगृह आस्‍थापनांनी  उपहारागृहात लावणे आवश्‍यक आहे.

आ)उपहारगृह/बारमध्‍ये  काम करणारे आचारी, वाढपे, व्‍यवस्‍थापक व स्‍वच्‍छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंध लसीकरण करणे आवश्‍यक राहील. ज्‍या कर्मचाऱ्यांच्‍या लसीकरणाच्‍या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्‍यानंतर १४ दिवस पूर्ण झाले आहे असेच  कर्मचारी व व्‍यवस्‍थापक उपहारगृह/बारमध्‍ये  काम करुन शकतील तसेच हे सर्व कर्मचारी व व्‍यवस्‍थापनाने उपहारगृहात मास्‍कचा वापर करणे  अनिवार्य  राहील.

इ)      वातानुकूलिक उपहारगृह/ बार असल्‍यास,  वायुविजनासाठी  खिडक्‍या असल्‍यास, कमी कमी दोन खिडक्‍या  किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्‍यासाठी पंखे लावणे आवश्‍यक राहील.

ई)      प्रसाधनगृहातील उच्‍च क्षमतेचा एक्‍झॉस्‍ट फॅन असणे आवश्‍यक राहील.

उ)     उपहारगृह/ बारमध्‍ये  विहीत शारिरीक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन व्‍यवस्‍था करण्‍यात यावी.

ऊ)   उपहारगृह बारमध्‍ये  निर्जंतुकीकरणाची, सॅनिटायझरची व्‍यवस्‍था असणे  आवश्‍यक राहील.

या अटीशर्तींच्या अधीन राहून उपहारगृहे/ बार सुरु ठेवण्‍यास सर्व दिवस रात्री दहा वा. पर्यंत मुभा देण्‍यात येत आली आहे.  उपहारगृह/ बारमधील भोजनासाठी  ग्राहकांकडून  शेवटची मागणी जास्‍तीत जास्‍त  रात्री नऊ  वाजेपर्यंत  घ्‍यावी.   मात्र पार्सल सेवा २४ तास सुरु ठेवण्‍याची  मुभा देण्‍यात आली आहे.

अन्य आस्थापनांबाबत-

१.      दुकाने-  अकोला जिल्ह्यातील  सर्व व्‍यापारी दुकाने सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत  सुरु ठेवण्‍याची मुभा देण्‍यात येत आहे.  दुकानात काम करणाऱ्या सर्व  व्‍यवस्‍थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्‍मक  सीकरणाच्या  दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेतल्‍यानंतर १४ दिवस पूर्ण होणे आवश्‍यक आहे.

२.      शॉपिंग मॉल्‍स -  अकोला जिल्‍हयातील  सर्व शॉपिंग मॉल्‍स सर्व दिवस रात्री 10.00 वाजेपर्यंत  सुरु ठेवण्‍याची मुभा देण्‍यात येत आहे.  तथापी मॉलमध्‍ये काम करणा-या  सर्व व्‍यवस्‍थापन  व कर्मचारी आणि प्रवेश करणा-या सर्व नागरीकांचेही  कोविड  प्रतिबंधात्‍मक  लसीकरणाच्‍या  दोन मात्र पूर्ण  व दुसरी मात्रा घेतल्‍यानंतर १४ दिवस पूर्ण झालेले असणे आवश्‍यक राहिल व तसेच लसीकरण  प्रमाणपत्र व त्‍यासमवेत फोटोसहित ओळखपत्र  प्रवेशद्वारावर दाखविणे  आवश्‍यक राहील.

३.      जिम्‍नेशिअम, योगसेंटर, सलुन-स्‍पा-  वातानुकूलित तसेच विनावातानुकलित जिम्नॅशिअम, योगा सेंटर , सलून-स्‍पा ५०%  क्षमतेने सर्वदिवस रात्री दहा वाजेपर्यंत सुरु ठेवण्‍याची मुभा राहील. तथापि, ज्‍या संस्‍था वातानूकूलीत असल्‍यास,  वायुविजनासाठी  फॅन  व वातातूकूलनासह  खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे  आवश्‍यक राहील.

४.    इनडोअर स्‍पोर्ट-  इनडोअर स्‍पोर्ट  असलेल्‍या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्‍यवस्‍थापन यांच्‍या कोविड प्रतिबंधात्‍मक  लसीकरणाच्‍या दोन मात्रा पूर्ण  व दुसरी मात्रा झाल्‍यानंतर  १४ दिवस झालेले असणे आवश्‍यक राहील.  तसेच, या ठिकाणी  हवा खेळती राहण्‍यासाठी आवश्‍यक व्‍यवस्‍था करण्‍यात यावी.   या ठिकाणी  खेळाडूंना  बॅडमिटंन , टेबलटेनिस, स्‍क्‍वॅश, पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्‍याची मुभा देण्‍यात येत आहे.

५.     कार्यालय / औद्योगीक / सेवाविषयक आस्‍थापना - 

अ)   सर्व शासकीय / निमशासकीय आस्‍थापनांचे  कर्मचारी, बॅंक कर्मचारी , रेल्‍वे  व म्‍युनिसीपल कर्मचारी  व व्‍यवस्‍थापन यांचे कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरण प्राथम्‍याने पूर्ण करण्‍यात यावे. 

आ)ज्‍या खाजगी  व औद्योगीक आस्‍थापनाच्‍या कर्मचाऱ्यांचे  व्‍यवस्‍थापनाचे  कोविड  प्रतिबंधात्‍मक  लसीकरण पूर्ण झालेले असेल त्‍या आस्‍थापनांना पूर्ण क्षमतेले सुरु ठेवण्‍याची मुभा देण्‍यात येत आहे.

इ)      सर्व आस्‍थापनांनी गर्दी टाळण्‍यासाठी  शक्‍यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे  व्‍यवस्‍थापन करावे. ज्‍या आस्‍थापनावरील कर्मचाऱ्यांना  घरुन काम करणे शक्‍य आहे अशा सर्व आस्‍थापनांच्‍या व्‍यवस्‍थापनांनी कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्‍याची मुभा द्यावी.  कार्यालयात  काम करणे आवश्‍यक असल्‍यास,  कर्मचाऱ्यांना  गर्दीच्‍या वेळी प्रवास टाळणे  शक्‍य  होईल अशा प्रकारे कार्यालयीन  वेळेचे  व्‍यवस्‍थापन करण्‍यात यावे.

ई)      तसेच खाजगी  कार्यालयांना वेळेचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी  कार्यालये  २४ तास सुरु ठेवण्‍याची  मुभा देण्‍यात येत आहे.  मात्र अशा शिफ्ट  व्‍यवस्‍थापनांतर्गत  कार्यालयांना  एका शिफ्ट मध्‍ये  कार्यालयातील  एकूण कर्मचारी   संख्‍येंच्‍या  २५ %  उपस्थिती मर्यादित करणे आवश्‍यक राहील.

६.      अकोला जिल्ह्यातील  सर्व मैदाने , उद्याने , चौपाट्या  स्‍थानिक प्राधिकरणाने  विहित केल्‍यानुसार, त्‍यांच्‍या नियमित वेळेत सुरु राहतील.

७.    विवाह सोहळे- 

अ)   खुल्‍या प्रांगणातील / लॉन वरील किंवा  मंगल कार्यालयातील  विवाह सोहळे संबंधित प्रांगण / लॉन / मंगल कार्यालय / हॉटेल मधील आसन व्‍यवस्‍थेच्‍या ५० % क्षमतेने  व कोविड  प्रतिबंधात्‍मक  उपाययोजनांचे  संपूर्ण  पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्‍या प्रयोजनार्थ  सुरु ठेवण्‍याची मुभा देण्‍यात येत आहे.

आ)खुल्‍या मैदानात / लॉन मध्‍ये होणा-या विवाह सोहळयास उपस्थितांची  संख्‍या प्रांगण किंवा लॉन क्षमतेच्‍या ५० %  परंतू जास्‍तीत जास्‍त २०० व्‍यक्‍ती या मर्यादेत असेल.

इ)      मंगल कार्यालय / हॉटेलमध्‍ये उपस्थितांची  संख्‍या क्षमतेच्‍या  ५० % परंतू  जास्‍तीत जास्‍त १०० व्‍यक्‍ती या मर्यादित असेल.

ई)      मात्र कोणत्‍याही परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्‍मक उपाययोनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्‍यासाठी व्‍हीडीओ रेकॉर्डींग  रणे व आवश्‍यकतेनुसार सक्षम प्राधिकाऱ्याला तपासणीसाठी उपलब्‍ध करुन देणे आवश्‍यक राहील. या निर्बंधाचे  उल्‍लंघन करणाऱ्यावर  तसेच  संबंधित हॉटेल / कार्यालयावर दंडनीय कारवाई  तसेच संबंधि  हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्‍याची कार्यवाही करण्‍यात येईल.

उ)     मंगल कार्यालय / हॉटेल / लॉन व्‍यवस्‍थापन / भोजन व्‍यवस्‍थापन / बॅंडपथक / भटजी/ फोटोग्राफर्स अशा विवाह व्‍यवस्‍थेशी संबंधीत  सर्व संलग्‍न  संस्‍था या मधील व्‍यवस्‍थापक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरण पूर्ण होवून दुसरी मात्रा घेतल्‍यानंतर  १४ दिवस पूर्ण  होणे अनिवार्य  राहील व त्‍यानुसार ओळखपत्रासह  लसीकरण प्रमाणपत्र  सोबत असणे  आवश्‍यक राहील.

८.     सिनेमागृहे व मल्टिप्लेक्‍स -  अकोला जिल्ह्या  सिनेमागृह / नाट्यगृह / मल्‍टीप्‍लेक्‍स (स्‍वतंत्र तसेच  शॉपिंग मॉलमधील )  पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.

९.      धार्मिक स्‍थळे -  अकोला  जिल्ह्यातील  सर्व धार्मिक स्‍थळे पुढील आदेशापर्यंत  नागरीकांसाठी  बंद राहतील.

१०.  कोविड प्रतिबंधात्‍मक उपायोजना म्‍हणून राज्‍यात गर्दी  व्‍यवस्‍थापन करण्‍याबाबत केन्‍द्र शासनाने  तसेच  मा. सर्वोच्च  न्‍यायालयाने  निर्देशित केले आहे. यास्‍तव गर्दी /जमाव टाळण्‍यासाठी  वाढदिवस, राजकीय, धार्मिक,सामाजिक व सांस्‍कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार सभा, रॅली, मोर्चे  इ. वरील निर्बंध कायम राहतील.

११.  जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी  कोविड प्रतिबंधात्‍मक उपाययोजना जसे की,  मास्‍कचा वापर,  हाताची  स्‍वच्‍छता, शारिरीक अंतराचे  पालन, इतरत्र थुंकण्‍यास  प्रतिबंध.  सर्व निर्बंधांचे  पालन करणे अनिवार्य राहील. या बाबत सर्व सबंधित प्राधिकारी यांनी आपले स्‍तरावरुन  आवश्‍यक पथकाचे गठन करुन नियमानुसार आवश्‍यक ती कार्यवाही करावी.

१२.  सर्व दुकाने, कार्यालये, औद्योगिक आस्‍थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक/ व्‍यवस्‍थापनाने  त्‍यांचे आस्‍थापनेवर कार्यरत असलेल्‍या व्‍यवस्‍थापक तसेच कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्‍मक  लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण होऊन १४ दिवस झाल्‍याची  खातरजमा करावी व यासाठी  मागणी केल्‍यास त्‍यांना उपलब्‍ध  करुन द्यावी.

१३.  दुकाने/उपहारगृहे/बार/मॉल्‍सचे/कार्यालये/ औद्योगीक आस्‍थापना  यांचे नियतकालिक निर्जंतूकीकरण  व सॅनीटायझेशन करण्‍याची  जबाबदारी संबंधि  मालकाची  व व्‍यवस्‍थापनाची  असेल.  तसेच  यामध्‍ये  कर्मचारी तसेच ग्राहकांचे  तापमान घेण्‍यासाठी  इन्‍फ्रारेड/कॉन्‍टॅक्‍ट लेस थर्मामिटर  याची व्‍यवस्‍था करयात यावी.  तसेच  यामध्‍ये मास्‍क डिस्‍पेंसर व बायोमेडीकल बेस्‍ट (वापरलेले मास्‍क व टिशू पेपर्स  इत्‍यादीची  विल्‍हेवाट )  जमा करण्‍याची  व विहीत कार्यपद्धतीने  विल्‍हेवाटीसाठी देण्‍याची  जबाबदारी   संबधीत आस्‍थापनांची  राहील.

१४.कोविड नियमांचे  ल्लंघन करणाऱ्या व्‍यक्‍तींवर दंडात्‍मक कारवाई  करण्‍याबाबतचे आदेश यापुढेही कायम राहतील. या बाबत काटेकार तपासणी  व अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी संबंधि  अनुज्ञप्‍ती प्राधिकारी,  आयुक्त महानगरपालिका, जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला, महसूल विभाग तसेच  ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधित नगर पालीका/नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी यांची राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्‍याची जबाबदारी उपविभागीय अधिकारी तथा INCIDENT COMMANDER व तहसिलदार व पोलीस विभाग यांची राहील.

हे आदेश रविवार दि.१५ ऑगस्ट २०२१ पासून ते पुढील आदेशापर्यंत संपूर्ण अकोला जिल्ह्यासाठी लागू राहतील. या आदेशांचा भंग करणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी दिला आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ