कोविड लसीकरणासाठी जिल्ह्याला जादा डोस उपलब्ध


अकोला, दि.२६(जिमाका)- कोविडची पुढील तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता शासनाने जिल्ह्यासाठी कोविड लसीचे अतिरिक्त डोस उपलब्ध करून दिले आहेत.   तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा व कोविडच्या तिसऱ्या लाटेपासून स्वतःचे संरक्षण करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. 

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आज अकोला जिल्हा करिता कोव्हीशिल्ड चे १९ हजार व कोव्हक्सीनचे ३५०० लस उपलब्ध झाली आहे.सर्व प्रा.आ.केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व महानगर पालिका अकोला यांना लस वितरीत करण्यात आली आहे.
  या लसीकरणासाठी शुक्रवार (दि.२७) व शनिवार (दि.२८)  रोजी ८० सत्रांचे आयोजन संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले आहेत.  
   तरी सर्व १८ वर्षा वरील नागरिकांनी, ज्यांचा दुसरा डोस घ्यायचा राहून गेला त्यांनी सर्वांनी आपला दुसरा डोस जवळच्या लसीकरण केंद्रात जावून घ्यावा.  तसेच ज्यांनी आज पर्यंत  एकही डोस घेतलेला नाही, त्यांनी सुद्धा आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रात जावून लस घ्यावी.  
  लसीकरण केंद्रावर जाताना तोंडाला मास्क घालून जावे, गर्दी करू नये, सोबत मोबाईल नंबर व आधार कार्ड किंवा इतर आयडी प्रुफ सोबत न्यावा.काही अडचण असल्यास आपल्या गावातील आशा कार्यकर्ती यांचेशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ