रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 346 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
अकोला,दि.9(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.8) दिवसभरात झालेल्या 346 चाचण्या झाल्या त्यात शून्य जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला येथे एक,अकोला महानगरपालिका येथे 294, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 15, वैद्यकीय महाविद्यालय येथे 36 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 346 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शून्य जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लक्ष सात हजार 918 चाचण्या झाल्या पैकी 14473 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा