सप्टेंबर महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण निश्चित

             अकोला, दि.१३(जिमाका)- जिल्ह्यासाठी सप्टेंबर महिन्यासाठी  लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे.

वाटप परिमाण व दर याप्रमाणे-

१.      प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी (गहू/मका/ज्वारी) तीन किलो प्रतिव्यक्ती रब्बी पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत योजनेअंतर्गत तहसिल कार्यालयात खरेदी करण्यात आलेल्या मका व ज्वारीचे तहसिलदार/ अन्न वितरण अधिकारी यांनी निश्चित केलेल्या वाटप परिमाणानुसार प्राधान्य कुटूंबातील लाभार्थ्यांना त्याच प्रमाणात  गव्हाचे नियतन कमी करुन मका व ज्वारीचे वाटप करण्यात यावे. दर गहू दोन रुपये प्रतिकिलो/ मका/ज्वारी एक रुपया प्रतिकिलो.

२.      प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ दोन किलो प्रतिव्यक्ती, तीन रुपये प्रतिकिलो.

३.      अंत्योदय अन्न योजना गहू- १५ किलो प्रतिकार्ड, दोन रुपये प्रतिकिलो.

४.    अंत्योदय अन्न योजना तांदूळ-२० किलो प्रतिकार्ड, तीन रुपये प्रति किलो.

५.     एपीएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांकरीता गहू-चार किलो प्रतिव्यक्ती, दोन रुपये प्रतिकिलो.

६.      एपीएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांकरीता तांदूळ- एक किलो प्रतिव्यक्ती, तीन रुपये प्रतिकिलो.

७.     नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांकरीता-एक किलो प्रतिशिधापत्रिका, २० रुपये प्रतिकिलो.

८.     प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत  प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी गहू, तांदूळ- प्रतिसदस्य प्रतिमाह तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ (मोफत)

९.      प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत  अंत्योदय अन्न योजना गहू व तांदूळ- प्रतिसदस्य प्रतिमाह तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ (मोफत)

हे वाटप परिमाण गोदामातील साठ्याच्या व लाभार्थ्यांच्या संख्या उपलब्धतेनुसार राहील,असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ