स्वातंत्र्य दिन वर्धापन सोहळा जिल्हा मुख्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते आज (दि.१५) ध्वजारोहण

 अकोला, दि.१४(जिमाका)-  भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ रविवार दि.१५ रोजी सकाळी ९ वा. ५ मि. नी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे. यावेळी राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन होणार असल्याचे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.

        यानिमित्त शासकीय ध्वजारोहण हे जिल्हा, उपविभागीय, तालुका तसेच ग्रामपंचायत पातळीवर करण्यात यावे,असे निर्देश शासनाने दिले असून  जिल्ह्याच्या मुख्यालयी पालकमंत्री ध्वजारोहण करतील. ध्वजारोहणाचा मुख्य समारंभ हा सर्व ठिकाणी एकाच वेळी  म्हणजे सकाळी नऊ वा. पाच मि.नी होईल.  त्यामुळे सकाळी आठ वा. ३५ मि. ते सकाळी ९ वा. ३५ मि. या कालावधीत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय कार्यक्रम आयोजीत करु नये. जर एखाद्या संस्थेला वा कार्यालयाला  ध्वजारोहण समारंभ करावयाचा असेल तर तो त्यांनी  सकाळी आठ वा. ३५ मि. पूर्वी किंवा ९ वा. ३५ मि. नंतर आयोजीत करावा. कोविडची पार्श्वभुमी लक्षात घेता स्वातंत्र्य दिन समारंभात सामाजिक अंतर, मास्क लावणे आवश्यक आहे,असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुख्य शासकीय समारंभाचे जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे फेसबुक लाईव्ह

दरम्यान मुख्य शासकीय समारंभ सर्व लोकांना पाहता यावा यासाठी जिल्हा माहिती कार्यालय अकोला यांच्या फेसबुकपेजवरुन या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. www.facebook.com/@dioakola येथे भेट देऊन वा  https://fb.watch/7nrn9uULgT/ या लिंकवर आपण हा सोहळा पाहू शकता.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ