मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन(दि.29ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा

 

अकोला,दि.26(जिमाका)-  क्रीडा संस्कृतीची जोपासना जिल्ह्यातील नागरिकामध्ये क्रीडा विषयक वातावरण निर्मिती होण्याच्या दृष्टीने संपुर्ण राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 29 ऑगस्ट हा दिवस हॉकी खेळाचे महान खेळाडु मेजर ध्यानचंद यांचा जन्मदि रविवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी  8.30  वाजता क्रीडा दिन म्हणुन साजरा करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांनी केले.    

क्रीडा युवक सेवा  संचालनालय जिल्हा  क्रीडा अधिकारी यांच्या विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा कार्यालय, स्व. वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे होणार आहे. कार्यक्रम पुढीलप्रमाणे : सकाळी साडेआठ वाजता मेजर ध्यानचंद यांचे प्रतिमेचे पुजन त्याचे जिवनपटावर व्याख्यान  शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त  पुरस्कारार्थी आंतरराष्ट्रीय खेळाडुंचा सत्कार, सकाळी नऊ वाजता खेळाडु फिटनेस या विषयावर ऑनलाईन पध्दतीने  वेबीनारव्दारे पतांजली योगपीठचे रश्मी जोशी यांचे मार्गदर्शन, सकाळी 10 वाजता चर्चा सत्राचे आयोजन.

हॉकी खेळाचे महान खेळाडु मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन (29 ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचे दृष्टीने जिल्ह्यातील शैक्षणीक संस्था, एकविध खेळाच्या क्रीडा संघटना यांनी आपल्या संस्थेमार्फत ऑनलाईन पध्दतीने विविध खेळाची चर्चासत्रे, वेबीनार, संस्थेतील राज्य, राष्ट्रीय खेळाडुचे सत्काराचे आयोजन करुन जिल्ह्यात क्रीडा विषयक वातावरण निर्माण करुन खेळाडुंना प्रोत्साहीत करण्यात यावे. शासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या कोविड-19 बाबतच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन कार्यक्रमाचे नियोजन करावे.  

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ