मनपा, पोलीस व शहर वाहतूक विभागाव्‍दारे गुरुवार (दि.2) पासून शहरात अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविणार- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आदेश

 


अकोला,दि.31(जिमाका)-  सणा-सुदीचे दिवस लक्षात घेता शुक्रवार दि. 2 सप्‍टेंबर पासून शहरातील सर्व मुख्‍य रस्‍त्‍यांवरील अतिक्रमणावर मनपा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि शहर वाहतुक विभागाव्‍दारे अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविण्‍यात येणार आहे, असे आदेश जिल्‍हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

अकोला शहरामधील मुख्‍य रस्‍ते तसेच मुख्‍य बाजार पेठ येथे विविध व्‍यवसाय करणा-या हॉकर्स व्‍दारे तसेच बाजार पेठ येथील ब-याच दुकानदारांव्‍दारे टीनशेड टाकून करण्‍यात आलेल्‍या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होवून नागरिकांना वाहतुकीसाठी खूप मोठ्या प्रमाणात होत असलेली अडचण पाहता प्रशासनाव्‍दारे शहरातील मुख्‍य रस्‍त्‍यावरील अतिक्रमण धारकांसाठी पर्यायी व्‍यवस्‍था म्‍हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्य गृह येथील मैदान, भाटे क्‍लब येथील मैदान आणि जठार पेठ येथील भाजी बाजार येथे व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच शहरातील सर्व हॉकर्स यांना आवाहन करण्‍यात ये‍त आहे कि, त्‍यांनी उद्यापासून आपले व्‍यवसाय प्रशानाने ठरवून दिलेल्‍या जागेवरच करावे. अन्‍यथा शुक्रवार दि. 2 सप्‍टेंबर पासून सुरू होणा-या अतिक्रमण निर्मुलन मोहीमे अंतर्गत अतिक्रमण धारकांचे साहित्‍य जप्‍त करून त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येणार आहे, असे प्रशासनाव्दारे कळविण्यात आले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ