शिकाऊ उमेदवारी योजना; प्रशिक्षणार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 अकोला,दि.22(जिमाका)- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून उत्तीर्ण झालेल्या विविध व्यवसायातील अर्धकुशल उमेदवारांसाठी स्थानिक स्तरावर शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनांतर्गत कौशल्य तसेच रोजगार प्राप्त होऊन कौशल्यपूर्ण होण्यासाठी तसेच महानगरपालिका यांची औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण कौशल्यप्राप्त उमेदवारांद्वारे आवश्यक कौशल्यप्राप्त मनुष्यबळाची गरज भा‍गविण्याकरीता शिकाऊ उमेदवारी योजना राबविण्याच्या बिटीआरआय व आयटीआय यांच्या प्रस्तावास महानगरपालिका यांनी मान्यता देऊन आस्थापनेची कौशल्य विकास व उद्योजकता विभाग तसेच भारत सरकारच्या apprenticeshipindia.org या पोर्टलवर नोंदणी केलेली आहे. याद्वारे विविध व्यवसायाच्या आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना रोजगार व प्रशिक्षणाच्या संधी निर्माण झाल्या आहेत. या योजनेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन मिळणार असून विद्यावेतनाच्या 25 टक्के किंवा 1 हजार 500 रुपये प्रतिमाह प्रति उमेदवारास यातील कमी रक्कम आस्थापनेस नॅशनल अप्रेंटीशिप प्रमोशन स्किम (एनएपीएस) अंतर्गत दिल्या जाईल. तसेच महाराष्ट्र अप्रेंटीशिप प्रमोशन स्किम (एमएपीएस) अंतर्गत आस्थापनेस विद्यावेतनाच्या 75 टक्के किंवा 5 हजार रूपये यापैकी कमी असेल ती प्रतिमाह प्रति उमेदवार प्रतिपूर्ती करण्याचे प्रस्तावित आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करू शकणाऱ्या औद्‌योगिक आस्थापनांचा अभाव असल्याच्या पार्श्वभुमीवर आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना महानगरपालिकेच्या मान्यतेने रोजगार व प्रशिक्षणाच्या संधीत वाढ करणे शक्य झाले आहे. इच्छुक उमेदवारांनी पोर्टलवरील माहिती प्राप्त करून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केन्द्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे अंशकालिन प्राचार्य यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ