अनु.जमातीच्या विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती; शुक्रवार (दि.3) पर्यंत अर्जास मुदत वाढ

 अकोला,दि.25(जिमाका)- आदिवासी विकास विभागाकडून अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी तसेच पदव्युतर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे, यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. या अंतर्गत राज्यातून दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. त्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृतीसाठी शुक्रवार दि. 3 सप्टेंबर पर्यत अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे. विहित नमुन्यातील अर्ज, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अकोला येथे उपलब्ध असून अर्जाकरीता आवश्यक असलेली पात्रता, अटीशर्ती याबाबतची माहिती एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प, कार्यालय येथे फलकावर लावण्यात आली आहे. तरी विद्यार्थ्यांने अर्ज करण्याचे प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.                                                                      ००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ