३१२ अहवाल, एक पॉझिटीव्ह; सात डिस्चार्ज

 अकोला,दि.१३(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ३१२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३११ अहवाल निगेटीव्ह तर एक अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.१२) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८००(४३२०७+१४४१६+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य  = एकूण पॉझिटीव्ह एक.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३०९१३३ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३०५५७८ फेरतपासणीचे ४०० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१५५ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३०९०९१ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २६५८८५ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

एक पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात एकाच अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका महिलेचा समावेश असून ही महिला अकोला मनपा हद्दीतील रहिवासी आहे.

दरम्यान काल (दि.१२) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची नोंद घ्यावी.

सात जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार जणांना तर होम आयसोलेशन मधील तीन जणांना असे सात जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

३८ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८००(४३२०७+१४४१६+१७७) आहे. त्यात ११३५ मृत झाले आहेत. तर ५६६२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ३८ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ