भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम

 





              अकोला,दि.20(जिमाका)- भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याचे निमीत्ताने अकोला जिल्हयाचे अमृत महोत्सेवी उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी संदर्भांत आज लोकशाही सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली.  या बैठकीत वर्षभरातील ५२ आठवड्यांचे नियोजन तसेच त्यानुसार प्रत्येक विभागाने राबवावयाच्या कार्यक्रमाची रुपरेषा निश्चित करण्यात आली. तसेच संबंधित विभागांनी  सादर केलेल्या आराखडयानुसार प्रस्तावित उपक्रमांची विहित कालावधीत अंकलबजावणी करणेबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बाळासाहेब बोटे, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी पी.व्ही.दुधे, जिल्हा परिषद गो.शि.पवार, जिल्हा समन्वयक NSS डॉ. संजय तिडके, नेहरू युवा केंद्राचे महेश सिं‍ह शेखावत, समन्वायक गजानन महल्लेश, सहायक स्वप्नील ओळंबे हे उपस्थिती होते.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ