पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

 अकोला,दि.१३(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शनिवार दि. १४ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शनिवार दि.१४ रोजी दुपारी एक वा. जिल्हा नियोजन समिती आढावा बैठक; स्थळः नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला. दुपारी तीन वा. कावड यात्रा महोत्सव आढावा बैठक; स्थळः नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला. दुपारी चार वा. पीएसए ऑक्सिजन प्लान्ट उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती; स्थळः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला., दुपारी साडेचार वा. अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्ष उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती; स्थळः जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला. सायं. पाच वा. शिवशंकरभाऊ पाटील श्रद्धांजली कार्यक्रमास उपस्थिती व शहरातील मान्यवर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रमास उपस्थिती; स्थळः मातोश्री वॉकींग ट्रॅक, गोरक्षण रोड. सायं. साडेपाच वा. स्व. मखराम पवार, माजी मंत्री यांच्या परिवारास सांत्वनपर भेट, त्यानंतर शासकीय विश्रामगृह अकोला येथे मुक्काम व राखीव.

रविवार दि.१५ रोजी सकाळी आठ वा. ५० मि. नी.  जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला कडे प्रयाण, सकाळी नऊ वा. भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थिती; स्थळः जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला.,सकाळी १० वा. सिंधु सिनिअर सिटीझन असो. अकोला यांच्यातर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, स्थळः हॅप्पी होम चर्चचे मागे, आदर्श कॉलनी, अकोला. सकाळी साडेदहा वा. व्यसनाधिनतेमुळे कुटुंबास येणाऱ्या अडचणी व उपाययोजनांबावत आढावा बैठक; स्थळः नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला., सकाळी ११ वा. अकोला जिल्ह्यातील जिल्हा/राज्य/राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना येणाऱ्या अडचणींबाबत आढावा बैठक स्थळः नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला., सकाळी साडेअकरा वा. तिडके टी.टी. स्पोर्ट्स शॉप उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती; स्थळः लाल बहादुर स्टेडीयम, टॉवर चौक, अकोला. दुपारी १२ वा. अकोला जिल्ह्यातील शहीद झालेल्या सैनिकांच्या परिवारांसोबत  चर्चा व स्नेहभोजन, स्थळः हॉटेल ग्रीन लॅंड, विद्यानगर अकोला. दुपारी दोन वा. स्व. शिवशंकरभाऊ पाटील रा. शेगाव यांच्या परिवारास सांत्वनपर भेट, सवडीने अकोट मार्गे ता. अचलपूर जि. अमरावतीकडे प्रयाण.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ