३०८ अहवाल, तीन पॉझिटीव्ह; सहा डिस्चार्ज; एक मृत्यू

 अकोला,दि.१२(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ३०८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३०५ अहवाल निगेटीव्ह तर तीन अहवाल पॉझिटीव्ह आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.११) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७७९९(४३२०६+१४४१६+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर तीन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक  = एकूण पॉझिटीव्ह चार.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३०८८४६ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३०५२९२ फेरतपासणीचे ४०० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१५४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३०८७७९ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २६५५७३ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

तीन पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आज  दिवसभरात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष  तर एका महिलेचा समावेश असून दोन पुरुष रुग्ण अकोला मनपा हद्दीतील रहिवासी आहे तर महिला अकोला ग्रामीण भागातील रहिवासी आहे.

दरम्यान काल (दि.११) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, त्याची नोंद एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी.

एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

दरम्यान आज एका अज्ञात पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे,असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कळविण्यात आले आहे.

सहा जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात बिहाडे हॉस्पिटल मधून एकास तर   होम आयसोलेशन मधील पाच जणांना अशा सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

४४ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७७९९(४३२०६+१४४१६+१७७)आहे. त्यात ११३५ मृत झाले आहेत. तर ५६६२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४४ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ