266 अहवाल, तीन पॉझिटीव्ह; रॅपिड चाचण्यातही तीन पॉझिटीव्ह

 

अकोला,दि.8(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 266 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 363 अहवाल निगेटीव्ह तर शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.7) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये तीन अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57789(43197+14415+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर तीन  + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी तीन = एकूण पॉझिटीव्ह सहा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 307585 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 304035  फेरतपासणीचे 397 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3153 नमुने होते. आजपर्यंत एकूण 307553 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 264356 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

   तीन पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष व एक महिलेचा समावेश आहे.

त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापूर-एक, अकोला-दोन(ग्रामीण क्षेत्र-एक, अकोला मनपा क्षेत्र-एक). दरम्यान काल (दि.7) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात तीन  अहवाल पॉझिटीव्ह आला, त्याची नोंद एकूण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे, याची नोंद घ्यावी.

58 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57789(43197+14415+177) आहे. त्यात 1134 मृत झाले आहेत. तर 56597 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 58 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना