239 अहवाल, एक पॉझिटीव्ह

 


अकोला,दि.19(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 239 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 238 अहवाल निगेटीव्ह आले, तर एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.18) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57807(43213+14417+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य  = एकूण पॉझिटीव्ह एक.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 310594  नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 307021 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3171 नमुने होते. आजपर्यंत एकूण 310570 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 267357 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

एक पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात एका पुरुषाचा समावेश असून तो बोरगाव जि. अकोला येथील रहिवासी आहे. दरम्यान रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात एकाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.

 

18 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57807(43213+14417+177) आहे. त्यात 1136 मृत झाले आहेत. तर 56653 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 18 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ