रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 437 चाचण्यात शून्य पॉझिटीव्ह



अकोला,दि.10(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.9) दिवसभरात झालेल्या 437 चाचण्या झाल्या त्यात शून्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात  अकोला येथे तीन, अकोट येथे 29, बाळापूर येथे 18, बार्शीटाकली येथे दोन,तेल्हारा येथे आठ, मूर्तिजापूर येथे 31, अकोला महानगरपालिका येथे 310, अकोला आयएमए येथे पाच, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 23, हेगडेवार लॅब येथे आठ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर तेल्हारा येथे पाच चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे 437 जणांच्या चाचण्या होऊन त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लक्ष 8 हजार 355 चाचण्या झाल्या पैकी 14473 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

०००००





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना