जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची स्थापना; मानव व प्राणी संघर्ष थाबविण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना राबवा

 


अकोला,दि.18(जिमाका)- जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची स्थापना करण्यात  आली आहे. या  समितीच्या मार्गदर्शनाखाली मानव व प्राणी संघर्ष थाबविण्यासाठी  कायमस्वरुपी उपाययोजना राबवावे, तसेच सदस्याकडून प्राप्त सूचनाचे तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश  जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक बैठकीत विविध विषयाचा आढावा  घेण्यात आला. यावेळी  जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. तुषार बावणे, सहयोगी अधिष्ठाता स्वातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था डॉ. अनिल भिकाने, जिल्हा वन अधिकारी, जिल्हा परिषद जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे डॉ. जी. एम. दळवी, पशुधन विकास अधिकारी डॉ. वाय. बी. बंजारे, प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीचे विशाल बोरे, प्रमोद इंगळे, सुधीर कडू, प्रकाश वाघमारे, भुषण पिंपळगावकर,  राजेंद्र तिहिले डॉ. मिलिंद निवाणे तसेच संजय वाघडकर आदि अशासकीय सदस्य उपस्थित होते.

मानव व प्राणी संघर्ष टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करा. तसेच  प्राण्यांच्या बचाव करतेवेळी स्थानिक रहिवाशाद्वारे विरोध होत आहे. अशा व्यक्तीवर पोलिस विभागाने कार्यवाही करावी. समितीतील सदस्याव्दारे देण्‍यात येणाऱ्या सूचनाचे प्राधण्याने अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

समितीव्दारे सूचवलेले उपाययोजना

भटक्या व जखमी प्राण्यासाठी निवारा केंद्र स्थापन करावे, जनावरांची अवैध वाहतुक तसेच अवैध कत्तल थांबविण्यासाठी पोलिस यंत्रणा तसेच परिवहन विभाग यांनी उचित कार्यवाही करावी, प्राण्यांच्या चराईसाठी असणारे गायराण अतिक्रमण मुक्त करुन चारा पिकांची लागवड करावी. वन प्राण्यांस पाणी पुरवठा होण्याकरीता कानशिवणी गावाजवळ वन विभागाच्या जमिनीवर तलाव बांधण्याकरीता  वन विभागाने पाहणी करून प्रस्ताव सादर करावा,  महानगरपालिका क्षेत्रामध्ये उघड्यावर होणारी चिकन विक्री तसेच अवैध मास विक्री या संदर्भात महानगर पालिका व पोलिस यंत्रणा यांनी संयुक्तरीत्या कार्यवाही  करावी.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ