किटकनाशक विषबाधासंबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजना; किटकनाशक वापराबाबत जनजागृती मोहिम राबवा

 



अकोला,दि.18(जिमाका)- जिल्ह्यामध्ये सर्वत्र पिक पेरणी झाली असून पिकांच्या संरक्षणासाठी किटकनाशकाचा वापर केला जातो. किटकनाशकाचा वापर करताना करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजची  जनजागृती मोहिम राबविण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृह किटकनाशकाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासंबंधी आढावा बैठक घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ.मुरली इंगळे, मोहीम अधिकारी मिलींद जंजाळ, पंचायत समितीचे कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.   

किटकनाशकाचा वापराबाबत जनजागृती करा. जनजागृती मोहिम राबविण्याकरीता शासनाने नोडल कंपनी म्हणून एफएमसी इंडिया प्रा.ली. कंपनीची नियुक्ती केली आहे. किटकनाशक वापराबाबत जिल्हा व तालुका स्तरावर जनजागृती करावी. तसेच किटकनाशकाचा वापर करताना विषबाधा झाल्यास त्याबाबतचा अहवाल तातडीने प्रशासनास सादर करावे, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिले.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे औषधे व वैद्यकशास्त्रज्ञ डॉ. अष्टपुत्रे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ किटकशास्त्र विभागाचे डॉ. उंदिरीवाडे व डॉ.कुळकर्णी यांनी किटकनाशक वापरासंबंधी मार्गदर्शन केले. तर  सिंजेट कंपनीच्या प्रतिनिधीनी कंपनीव्दारे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ