भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांची अकोला कार्यालयास भेट

 






अकोला,दि.20(जिमाका)- भुजल  सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त तथा संचालक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज अकोला येथील कार्यालयास भेट दिली. तसेच प्रयोग शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत उपसंचालक संजय कराड हेही उपस्थित होते.

यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रविण बर्डे आणि प्रयोशाळेतील व जिल्हा कार्यालयातील भूवैज्ञानिक व कार्मचारी तसेच प्रयोगशाळेतील रसायनी व अनु जैविक तज्ञ उपस्थित होते. जिल्हा प्रयोगशाळा NABL तसेच प्रयोगशाळेतील विविध उपकरणांची माहिती माननीय आयुक्त यांनी जाणून घेतली. यावेळी कार्यालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध विभागामध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेची भूमिका व संलग्नता याबाबत तसेच जलजनजागृती परिसंवाद, एन ए बी एल मानांकन, भूजल पुनर्भरणाचे पोस्टर तसेच सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमा चे संदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये आलेली  माहिती सादर केली. त्यानंतर विशेष प्रकल्प नागरी क्षेत्रातील विहिरींचे व विंधन विहिरीचे पुनर्भरण व वान प्रकल्प माध्यमातून विहिरींचे पुनर्भरण याबाबत वरिष्ठ भूवैज्ञानिक यांनी मांडणी केली व अहवाल सादर केला.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ