स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला यांच्यातर्फे सोमवार(दि.२३)पासून पाच दिवस ऑनलाईन कुक्कुट पालन प्रशिक्षण

 अकोला, दि.२१(जिमाका)- महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या कुक्कुट पालन  विभागाच्या वतीने  स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथे पाच दिवसांच्या कुक्कुट पालन  उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम  राबविण्यात येत आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम सोमवार दि.२३ ते शुक्रवार दि.२७ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी दोन या वेळात  ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. 

या प्रशिक्षणात व्यावसायिक ब्रॉयलर व अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे व्यवस्थापन, कुक्कुट पक्षांवरील आजार, विविध मूल्य वर्धित अंडी व मांस निर्मिती, सुधारीत देशी कुक्कुट पालन, कंत्राटी- करार पद्धतीने कुक्कुटपालन, लाव्ही, बटेर पालन याबाबत प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात कर्नल प्रा. डॉ. ए. एम. पातुरकर,  प्रा. डॉ. ए.पी.सोमकुवर, प्रा. डॉ. व्ही.डी. आहेर, प्रा. डॉ. पी.टी. जाधव इ. मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना  इ- प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्ष्ण हे झून क्लाऊड मिटींग या मोबाईल ॲपवर सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळात घेण्यात येईल. प्रशिक्षण शुल्क ५०० रुपये इतके आहे. शुल्क स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शाखा अकोला येथे  ऑनलाईन भरता येईल. (आयएफसी कोड SBIN0002171, खातेक्रमांक 30091047722)  नोंदणी करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSctPDFsQkH32iq_-m6Yy4BvsJB-G6kyGbdLzLBocjEAGsg3eQ/viewform?usp=pp_url या लिंकवर नोंदणी करावी. या प्रशिक्षणाचा अधिकाधिक शेतकरी बांधवांनी तसेच कुक्कुटपालन  उद्योगात पदार्पण करु इच्छिणाऱ्या व्यक्तिंनी  सहभागी व्हावे असे आवाहन सहयोगी अधिष्ठाता डॉ. अनिल भिकाने, डॉ. एम. आर. वडे, डॉ. सतीष मनवर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ