प्राधान्य व अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी माहे सप्टेंबर महिन्याचा नियतन मंजुर


अकोला,दि.23 (जिमाका)- जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी माहे सप्टेंबर करिता गहु व तांदुळाचे मासिक नियतन मंजुर झाले आहे. त्यात प्राधान्य गटातील 11 लक्ष 16 हजार 753 लाभार्थ्यांना गहुचे 33 हजार 500 क्विंटल व तांदुळाचे 22 हजार 330 क्विंटल मंजूर नियतन झाले आहे. तर अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी 1 लक्ष 89 हजार 011 करिता गहुचे 5 हजार 670 क्विंटल व तांदुळचे 3 हजार 780 क्विंटल मंजूर नियतन झाले आहे.  त्यानुसार माहे सप्टेंबर या कालावधीकरीता मोफत वितरण पुढील प्रमाणे :

प्राधान्य गटाकरीता अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 98 हजार 583 लाभार्थ्यांना गहुचा 5957 क्वि. तर तांदुळाचा 3971 ‍क्वि., अकोला ग्रामीण  शासकीय धान्य गोदाम येथे 2 लक्ष 9 हजार 465 लाभार्थ्यांना गहुचा 6283 क्वि. तर तांदुळाचा 4188 ‍क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 9 हजार 895 लाभार्थ्यांना गहुचा 3297 क्वि. तर तांदुळाचा 2197 ‍क्वि., अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 36 हजार 486 लाभार्थ्यांना गहुचा 4094 क्वि. तर तांदुळाचा 2729 ‍क्वि., तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 12 हजार 654 लाभार्थ्यांना गहुचा 3379 क्वि. तर तांदुळाचा 2253 ‍क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 37 हजार 578 लाभार्थ्यांना गहुचा 4127 क्वि. तर तांदुळाचा 2751 ‍क्वि., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 94 हजार 364 लाभार्थ्यांना गहुचा 2831 क्वि. तर तांदुळाचा 1887 ‍क्वि. व मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 17 हजार 728 लाभार्थ्यांना गहुचा 3532 क्वि. तर तांदुळाचा 2354 ‍क्वि., असे एकूण 11 लक्ष 16 हजार 753 लाभार्थ्यांना गहूचे 33500 क्विंटल तर तांदुळाचे 22330 क्विंटल मंजुर नियतन झाला आहे.

अंत्यादय लाभार्थ्यांसाठी अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे 6 हजार 295 लाभार्थ्यांना गहुचा 189 क्वि. तर तांदुळाचा 126 ‍क्वि., अकोला ग्रामीण  शासकीय धान्य गोदाम येथे 27 हजार 822 लाभार्थ्यांना गहुचा 835 क्वि. तर तांदुळाचा 556 ‍क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम येथे 27 हजार 679 लाभार्थ्यांना गहुचा 830 क्वि. तर तांदुळाचा 553 ‍क्वि., अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे 30 हजार 736 लाभार्थ्यांना गहुचा 922 क्वि. तर तांदुळाचा 615 ‍क्वि., तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे 27 हजार 192 लाभार्थ्यांना गहुचा 816 क्वि. तर तांदुळाचा 544 ‍क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 23 हजार 344 लाभार्थ्यांना गहुचा 700 क्वि. तर तांदुळाचा 467 ‍क्वि., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 20 हजार 838 लाभार्थ्यांना गहुचा 625 क्वि. तर तांदुळाचा 417 ‍क्वि. व मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 25 हजार 105 लाभार्थ्यांना गहुचा 753 क्वि. तर तांदुळाचा 502 ‍क्वि., असे एकूण 1 लक्ष 89 हजार 011 लाभार्थ्यांना गहूचे 5670 क्विंटल तर तांदुळाचे 3780 क्विंटल मंजुर नियतन झाला आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

00000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ