विधानसभा निवडणूक २०१९: विविध परवानग्यांसाठी ‘एक खिडकी’ कार्यान्वित करा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश


        अकोला,दि.२५(जिमाका)- विधानसभा   निवडणुकीसाठी उमेदवारांना  लागणा-या विविध पुर्व परवानग्यांसाठी निवडणूक ‍ निर्णय अधिकारी स्तरावर  ‘एक खिडकी सुविधा’  कार्यान्वित करा, असे निर्देश  जिल्हाधिकारी तथा जिल्हा  निवडणुक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.
            विधानसभा  निवडणूक २०१९ च्या पार्श्वभुमिवर जिल्हाधिकाऱ्यांनी  आज कायदा सुव्यवस्था संदर्भात  व्यवस्थेचा आढावा  घेतला.  यावेळी जिल्हा पोलीस   अधिक्षक अमोघ गांवकर , निवासी उप  जिल्हाधिकारी राम लठाड, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेश खवले, अभयसिंग मोहिते, गजानन सुरंजे, निलेश अपार आदि उपस्थित होते.
            यावेळी  जिल्ह्यातील पाचही विधानसभा  मतदार संघातील कायदा सुव्यवस्थेशी निगडीत सर्व बाबींवर चर्चा करण्यात  आली.  यावेळी उमेदवारांना  प्रचारा दरम्यान  लागणाऱ्या   पोलीस  प्रशासन, परिवहन विभाग,  तसेच  अन्य संबंधीत  विभागांच्या  लागणाऱ्या पुर्व परवानग्या एकाच ठिकाणी  मिळाव्या  यासाठी सर्व  निवडणूक निर्णय अधिकारी यांनी  ‘एक खिडकी सुविधा’  कार्यान्वित करावी. तेथे सर्व संबंधीत  विभागांनी आपापले सक्षम नोडल अधिकारी नियुक्त  करावे, असे निर्देश  जिल्हाधिकारी पापळकर यांनी दिले. यावेळी जिल्हा सिमा बंदोबस्त, भरारी पथके, अवैध  मद्यविक्री,  चेक पोस्ट याबाबत माहिती देण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ