जिल्ह्यात १४ मंडळात अतिवृष्टीची नोंद


          अकोला,दि.21(जिमाका)- जिल्ह्यातील अकोला, बार्शी टाकळी, तेल्हारा, बाळापूर, पातूर या तालुक्यातील काही महसूल मंडळात गेल्या २४ तासांत अतिवृष्टीची नोंद झाल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
शुक्रवार दि.२० रोजी सकाळी आठ  ते शनिवार दि.२१ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात अतिवृष्टी झालेले महसूल मंडळे याप्रमाणे कंसात गेल्या २४ तासातील पर्जन्य नोंद-
अकोला तालुका- सांगळूद (९१.४ मिमी), बोरगाव मंजू (७२ मिमी)
बार्शी टाकळी तालुका- बार्शी टाकळी (९० मिमी), महान (१६० मिमी), खेर्डा बु. (११५ मिमी)
तेल्हारा तालुका- तेल्हारा (८७ मिमी), अडगाव (६७ मिमी), पाथर्डी(७२ मिमी), हिवरखेड (६५ मिमी), पंचगव्हाण (८२ मिमी)
बाळापूर तालुका- निंबा (६८ मिमी), हातरुण (७६ मिमी)
पातूर तालुका- पातूर (११० मिमी), बाभुळगाव (१६४ मिमी)
 अतिवृष्टीमुळे या भागात नुकसान झाल्याची नोंद नाही,असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :