विधानसभा निवडणुक 2019 :संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर


अकोला,दि.24(जिमाका)- निवडणुक कालावधीत विविध बँकामधुन होणाऱ्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर बँक अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष ठेवुन अशा व्यवहाराबाबत तात्काळ निवडणुक  यंत्रणेस कळवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज बँक अधिकाऱ्यांना दिले.
            विधानसभा निवडणुक 2019 च्या अनुषंगाने आज जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार बँकानी उमेदवारांना द्यावयाच्या सुविधा तसेच विविध आर्थिक व्यहारांबाबत सुचना याबाबत माहिती देण्यात आली. या बैठकीस जिल्हाधिकारी पापळकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी निवडणुक उपजिल्हाधिकारी राजेश खवले,  जिल्हा परिषदेचे लेखा व वित्त अधिकारी एस.बी. सोनी, जिल्हा कोषागार अधिकारी एम.बी. झुंजारे, जिल्हा अग्रणी बँक  व्यवस्थापक आलोक तरानिया, लेखाधिकारी बी.के. कदम, एस.यु. घरडे, किशोर फुंडकर तसेच सर्व बँकाचे अधिकारी उपस्थित होते.
            यावेळी उपस्थित बँक अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली की, निवडणुकीसाठी उमेदवारांना सुरु करावयाचे खाते बँकानी तात्काळ करावे, तसेच उमेदवारांना चेक बुक लगेच द्यावे, जर एकापेक्षा अधिक उमेदवारांची खाती असतील तर स्वतंत्र काऊटर सुरु करावे. उमेदवारांना निवडणुक कालावधीचे महत्व जाणुन प्राधान्याने सुविधा द्यावी. तसेच निवडणुक काळात व दोन महिने आधीपासुन होणाऱ्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर करडी नजर ठेवावी. एकाच खात्यातून अनेकांना रकमा जाणे, अचानक एखाद्या खात्यावर वाढलेले आर्थिक व्यवहारांचे प्रमाण, रकमांचे आदान-प्रदान याबाबत तात्काळ निवडणुक यंत्रणेस कळवावे, इत्यादी सुचना देण्यात आल्या. या काळात बँकामधुन होणाऱ्या संशयास्पद  आर्थिक व्यवहारांवर करडी नजर  ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. याबाबतचे दैनंदिन अहवाल व अन्य बाबीसंदर्भातही उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात  आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :