प्रसार माध्यम प्रतिनीधींनी ईव्हिएम व व्हिव्हिपॅटची प्रात्यक्षिक पाहिली




            अकोला,दि.07 (जिमाका)- अकोला पुर्व व पश्चिम विधानसभा मतदार संघातंर्गत प्रसार माध्यम प्रतिनिधीसाठी ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशिनची प्रात्यक्षिक ‍आज शनिवार( दि. 7 ) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात घेण्यात आली. या प्रात्यक्षिकामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशिनव्दारे मतदान व मतदान झाल्याची खात्री मतदारांना होते. याबाबतचे प्रात्यक्षिक देण्यात आले. प्रसार माध्यमांच्या प्रतिनीधींनी स्वत: मतदान करून  मतदान झाल्याची खात्री करून घेतली. 
            या प्रात्यक्षिक शिबीराला उपजिल्हाधिकारी तथा अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गजानन सुरंजे , तहसिलदार तथा अकोला पुर्व विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय लोखंडे, नायब तहसिलदार विजय खेडकर, अजय तेलगोटे, तलाठी महेंद्र कदम, उज्वल मानकीकर, राजेंद्र देवीकर, अर्चना पाटील ,गुणवंत जाधव , एम एस चव्हाण तसेच प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.
000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :