किटकनाशकांमुळे विषबाधितांवर उपचार अमरावती विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा
अकोला,दि.17(जिमाका)- शासनाचा कृषि विभाग
, जिल्हा परिषद व सिंजेंटा इंडिया लि.
यांच्या संयुक्त विद्यमाने
किटकनाशके फवारतांना विषबाधीत
झालेल्या शेतकरी – शेतमजुर यांच्यावर
उपचार करण्यासंदर्भात आज जिल्हा
नियोजन सभागृहात अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची कार्यशाळा
संपन्न झाली.
या
कार्यशाळेचे उद्घाटन
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते
दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष
प्रसाद, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.
फारूखी, कोचिन येथुन
आलेले प्रमुख मार्गदर्शक डॉ.
व्ही. व्ही. पिल्ले, जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा
अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ, कृषि विकास अधिकारी डॉ. मुरली इंगळे, सिंजेंटा इंडियाचे अधिकारी
आयएमएचे अध्यक्ष डॉ. मोरे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेत अमरावती विभागातील अकोला ,बुलढाणा ,
अमरावती, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील
वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी
उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन
करतांना जिल्हाधिकारी पापळकर
म्हणाले की, किटकनाशक फवारणी करतांना घ्यावयाची खबरदारी व दक्षता याबाबत शासन
जनजागृती करीत आहे. तथापि
विषबाधेच्या घटना होत असतांना बाधितांवरील उपचाराबाबत प्राथमिक
आरोग्य केंद्र उपकेंद्र स्तरावरील
वैद्यकीय अधिकारी या संदर्भात अत्याधुनिक उपचार पध्दतीबाबत अवगत असावेत. कारण विषबाधेनंतर प्रथम उपचार
गावातील आरोग्य केंद्रातच होत असतात.
तेथेच वेळेवर व योग्य उपचार झाल्यास
पुढील अनर्थ टाळता येऊ शकेल. या उद्देशाने
या कार्यशाळेचे आयोजन आहे. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील
शेतकरी - शेतमजुरांतील योग्य व वेळीच
उपचार करण्यात गावपातळीवरील वैद्यकीय अधिकाऱ्यांची
भुमिका महत्वाची आहे. या कार्यशाळेत दोन सत्रात उपस्थित
वैद्यकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा