मतदान केंद्राच्‍या ईमारतीत, नावामध्‍ये बदल व अतिरीक्‍त सहाय्यकारी मतदान केंद्रे निर्माण करण्यास मान्यता



            अकोला,दि.30 (जिमाका)-  मा.भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूका 2019 विचारात घेता मतदान केंद्राच्‍या ईमारतीमध्‍ये बदल / मतदान केंद्राच्‍या नांवामध्‍ये बदल / अतिरीक्‍त सहाय्यकारी मतदान केंद्राचे प्रस्‍ताव सादर करण्‍याचे निर्देश होते. त्‍या अनुषंगाने मा.भारत निवडणूक आयोगाने दिलेल्‍या मार्गदर्शक सुचनेनूसार अकोला जिल्ह्यातील  मतदार संघाचे मतदान केंद्राचे प्रस्‍ताव मा.मुख्‍य निवडणूक अधिकारी,महाराष्‍ट्र राज्‍य,मंत्रालय मुंबई यांचे मार्फत मा.भारत निवडणूक आयोग, नवी दिल्‍ली निर्वाचन भवन यांना  सादर करण्‍यात आले होते.
                        त्‍याअनुषंगाने अकोला जिल्ह्यातील मतदान केंद्राच्‍या बदलाच्या  प्रस्‍तावास  मा.भारत निवडणूक आयोगाने  मान्‍यता प्रदान केली आहे .  त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यातील मतदान केंद्राबाबतची माहीती खालील प्रमाणे-


अ. क्र.
मतदार संघाचे नांव व अ.क्र
मतदान केंद्राची संख्‍या
 सहाय्यकारी मतदान केंद्राची प्रस्‍तावीत असलेल्‍या मतदान केंद्राची संख्‍या
मुळ मतदान केंद्रे + सहा असे एकुण मतदान केंद्रे

1
28 अकोट
331
0
331

2
29 बाळपूर
335
1
336

3
30 अकोला पश्चिम
283
17
300

4
31 अकोला पुर्व
350
0
350

5
32 मुर्तिजापूर
381
5
386

एकुण
1680
23
1703

अकोला जिल्‍हयातील  मतदान केंद्राच्‍या  नांवामध्‍ये  बदल करण्‍याबाबत.
अ. क्र.
मतदार संघाचे नांव व अ.क्र
मतदान केंद्राच्‍या नांवामध्‍ये बदल प्रस्‍तावित असलेल्‍या मतदानकेंद्राची संख्‍या
केंद्राचे क्रमांक

1
28 अकोट
0
0

2
29 बाळपूर
0

3
30 अकोला पश्चिम
6
129,130,262,263,264, 265,

4
31 अकोला पुर्व
0
0

5
32 मुर्तिजापूर
0


एकुण
6


            मतदान केंद्राच्‍या इमारतीमध्‍ये /ठिकाणात बदल करण्‍या बाबत.


अ. क्र.
मतदार संघाचे नांव व अ.क्र
मतदान केंद्राची संख्‍या
मतदानकेंद्राच्‍या ठिकाणामध्‍ये बदल प्रस्‍तापित  असलेल्‍या मतदान केंद्राची संख्‍या
मतदान केंद्राचा क्रमांक
बदलाची कारणे

1
28 अकोट
331
0
0
ईमारतीमध्‍ये बदल करण्‍याची आवश्‍यकता नाही

2
29 बाळपूर
335
0
0
इमारतीमध्‍ये बदल करण्‍याची आवश्‍यकता नाही

3
30 अकोला पश्चिम
283
13
4,35,131,132,133, 174,190,226,227,228, 243,244,245
निवडणूक प्रक्रीयेकरीता सुटसुटीत जागा नसल्‍यामुळे

4
31 अकोला पुर्व
350
4
203,204,205,206
इमारत शिकस्‍त झाल्‍यामुळे

5
32 मुर्तिजापूर
381
3
94,124,178
इमारत शिकस्‍त झाल्‍यामुळे

एकुण
1680
20




                        सर्व मान्‍यता प्राप्‍त राजकीय पक्षांनी जिल्ह्यातील सर्व मतदार संघामधील प्रत्‍येक मतदान केंद्राकरीता मतदान केंद्रस्‍तरीय अभिकर्ता नेमणूका करून मतदारसंघ निहाय नियुक्‍त केलेल्‍या मतदान केंद्रस्‍तरीय अभिकर्ता यांच्‍या नेमणूका करून  एकत्रित यादी जिल्‍हाध्‍यक्षांच्‍या स्‍वाक्षरी व शिक्‍क्‍यासह यादी मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे समक्ष द्यावी.
                        अकोला जिल्ह्यातील सर्व नागरीकांनी/ मतदारांनी आपले नविन मतदान केंद्र व यादी भाग क्रमांक यासंदर्भात माहीती करून घेण्‍यासाठी आपल्‍या मतदानकेंद्रस्‍तरीय अधिकारी , सुपरवायझर तसेच संबंधीत मतदार नोंदणी अधिकारी व तहसिलदार तथा सहा.मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालयात मतदार संघनिहाय मतदान केंद्राच्‍या याद्या व मतदार यादी भाग उपलब्‍ध आहेत. मतदारांनी संबंधीत कार्यालयाशी संपर्क साधावा जेणे करून विधानसभा निवडणूक 2019 मध्‍ये आपणास अडचण निर्माण होणार नाही, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अकोला जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
00000
                                           

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूक अकोला जिल्ह्यातील पाच मतदारसंघातील निकाल पुढीलप्रमाणे :